– वनविभागाला लक्ष देण्याची गरज
The गडविश्व
ता. प्र / दिवाकर भोयर (धानोरा), ७ ऑक्टोबर : तालुक्यातील बहुतेक भाग नक्षलग्रस्त, अतिदुर्गम असुन या परिसरात बांबु मोठ्या प्रमाणात आहे. डोगर, पहाडावर, झरनाच्या काठाला बांबुचे रोप पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उगवतात पण त्या बांबुना लहान रोप तयार होत असतानाच अवैध कटाची केल्या जाते. त्यामुळे दिवसागणिक बांबु उत्पन्न घटत चालले आहेत. त्यामुळे वेळीच वनविभागाने लक्ष देऊन बांबु घ्या रोपाची होणारी अवैध कटाई वेळीच थांबवुन, नियंत्रण ठेवण्याची मागणी परीसरातील लोकांनी केली आहे.
धानोरा तालुक्यातील राखीव जंगल, वनविभागाच्या हद्दीतील जंगलात बांबू लागवड केली जाते. त्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात खर्च नाही. बांबू रोप एकदाच करा आणि साठ वर्षापर्यंत पैसे कमवा असा मंत्र बांबू शेतीचा आहे. तरीही ग्रामीण भागात जमीन क्षेत्र असताना बाबूची शेती पाहिजे त्या प्रमाणात केल्या जात नाही. मात्र काही शेतकरी आजही शेताच्या सभोवताली बांबु लावताना आढळतात. वन विभागाने जे बांबूचे रोपवन तयार केले आहे त्या रोप वनातील बांबूच्या अंकुराची ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खुलेआम अवैध कटाई केली जात आहे. त्यामुळे भविष्यात बांबू मिळणे कठीण आहे. मात्र वनविभाग बांबू रोप अंकुराची तोड करणाऱ्या वर कारवाई करतानां दिसत नाही. वन विभागाच्या रोपवाटिकेत बांबूची रोपे तयार करतात. त्याचे रोप स्वस्त दरात शेतकऱ्यांना वाटप होते. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे शेतजमीन परिसरात मोकळी जागा असेल पडित त्या ठिकाणी बांबूच्या रोपाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना त्या बांबूपासून आर्थिक फायदा तर मिळतोच शिवाय शेतकरी वनात जाऊन शेतीच्या कुंपणासाठी जी झाडे तोडतात ते सुद्धा तोडावे लागणार नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात शेजारी मोकळ्या जागेत बांबू रोपाची लागवड करावी. अलीकडे शेतकऱ्यांनी आधुनिक व बदलती शेती केली पाहिजे शेतीच्या सभोवताल बांबूची लागवड केली पाहिजे. हि शेती शेतकऱ्यांना लाभदायक ठरू शकते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात बांबूच्या झाडाची खुलेआम कत्तल होत असल्याने बांबूचे रोपण दुर्मिळ होत आहे. बांबू रोपांच्या अंकुर क्षमतेवेळी कत्तल होत असल्याने विविध आणि महत्त्वाच्या कामासाठी उपयोगात येणारे बांबू तयार होत नसल्याने दिवसेंदिवस बांबू चा दुष्काळ पडताना दिसतो. मेलेल्या माणसांना नेण्यासाठी बांबु लागतात ते सुद्धा मिळने कठिण होत चालले आहे. बांबुच्या रोपात पौष्टिक तत्वे आहेत की नाही हा संशोधनाचा विषय असला तरी बांबू रोपे जेवणात वापरतात, त्या पासुन भाजी बनवितात, वडे बनवुन खातात, त्यांना वाळवून ठेवतात. बांबु टिकावु आहे. अनेक ठिकाणी त्याचा वापर करतात.बांबुची फरची बनविलि जाते. बांबु पासुन टोपल्या, ताटवे, बेंदवे, जुन्या काळात धान्य साठविण्यासाठी भोलि बनविलि जात होती. घराच्या छतावर कवेलू टाकण्यासाठी वापरल्या जायचे. अशा बहु आयामि, बहु उपयोगी बांबु ची आणि रोपाची विनाकारण कत्तल करू नये ते कोणाच्याही हिताचे नाही.
बांबू बाबत वनविभागाने लोकांमध्ये जनजागृती करावी, कार्यशाळा आयोजित करुण बांबु चे महत्त्व पटवून दिले तर बांबु रोपाची होनारी अवैध कत्तल काही प्रमाणात कमी होईल आणि महत्वही लोकांना पटेल. जुन, जुलैत पडनाऱ्या पावसा पासुन बांबुच्या झाडांना अंकुर फुटतात आणि ऑगस्ट महिन्यात थोडी वाढ झाल्यानंतर वरती येणारे रोप एक ते दोन फुटांपर्यंत वाढ झाल्यानंतर लोक तोडायला सुरुवात करतात यालाच ग्रामीण भागात “वास्ते “म्हणतात हे बांबूचे कोवळे अंकुर वास्ते जेवणात वापरले जातात. त्यासाठी बांबूच्या अंकुराची मोठ्या प्रमाणात तोड केली जाते ही एक प्रकारची भ्रूणहत्या होय असे म्हणायला हरकत नाही. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, कोरची, कुरखेडा व इतर काही तालुक्यात बांबूचे रोपवणे आहेत त्या ठिकाणचे हे बांबूचे कोवळे अंकुर मोठ्या प्रमाणात तोडले जातात काही लोक वास्ते विक्रीचा व्यवसाय करतात शहरातील लोकांकडून वास्त्याला मोठी मागणी असते. अशा या बांबु रोपाची होणारी कत्तल वेळीच थांबली पाहिजे तर च बांबु टिकेल आणि भाविक पिढीला उपयोगी पडेल.
