सरळसेवा भरती प्रक्रिया २०१९ व २०२१ चे परिक्षा शुल्क परत मिळणार

668

The गडविश्व
गडचिरोली, १२ सप्टेंबर : जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क मधील मार्च २०१९ ची जाहिरात व त्या अनुषंगाने प्राप्त झालेले उमेदवारांचे अर्ज तसेच ऑगस्ट २०२१ मधील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेली जाहिरात व संपूर्ण भरती प्रक्रिया ग्राम विकास विभागाचे शासन निर्णय २१ ऑक्टोबर २०२२ अन्वये रद्द करण्यात आली असुन जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे शुल्क परत करावयाचे आहे. उमेदवारांचे परिक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर लिंक उमेदवारांसाठी ०५ सप्टेंबर २०२३ पासुन सुरु करण्यात आली आहे. उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर भेट देऊन माहिती काळजीपुर्वक भरुन घ्यावी. उमेदवारांनी भरलेल्या माहितीच्या अनुषंगाने परिक्षा शुल्क त्यांचे बँक खात्यावर परत करण्यात येईल.
उमेदवारांनी चुकीची माहिती भरल्यामुळे परिक्षा शुल्क त्यांचे बँक खात्यावर परत न झाल्यास जिल्हा परिषद, गडचिरोली जबाबदार राहणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांकडुन प्राप्त कोणतीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here