‘एक गाव, एक वाचनालय’ उपक्रमाचे कोटगुल वाचनालयाच्या लोकार्पणाने सुरुवात

1213

– कोटगुल व परिसरातील लोकांचा वाचनालय उभारणीत स्वयंस्फुर्तीने सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, २० जानेवारी : वाचन संस्कृतीनेच युवापिढीमध्ये आमुलाग्र बदल घडु शकतो असे प्रतिपादन गडचिरोली पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले. ते ‘एक गाव, एक वाचनालय’ उपक्रमाचे कोटगुल येथील वाचनालय लोकार्पण सोहळा १८ जानेवारी रोजी पार पडला यावेळी बोलत होते.
गडचिरोली पोलीस दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांच्या संकल्पनेतून एक गाव, एक वाचनालय हा उपक्रम सुरु करण्यात आला असून सदर योजनेची प्रायोगीक तत्वावर पेरमिली, बामणी, रेगडी व मुलचेरा येथे सुरुवात करण्यात आलेली आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरिक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी तसेच त्यांच्या उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी यासाठी कोटगुल परिसरातील नागरिक व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने लोकवर्गणी व श्रमदानातून कोटगुल येथील पडीत जुन्या अंगणवाडीची दुरुस्ती करुन सुसज्ज व आधुनिक सार्वजनिक वाचनालयाची निर्मीती करण्यात आली. सदर वाचनालयाचे १८ जानेवारी २०२३ रोजी पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांचे हस्ते उद्घाटनाद्वारे लोकार्पण सोहळा पार पडला.
सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे आगमन होताच ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली. यामध्ये पानाफुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये भारताचे संविधान ठेवण्यात आले होते. तसेच गावातील प्रमुख मार्गावरुन शाळेतील विद्यार्थी व परिसरातील नागरीकांसह ही ग्रंथदिंडी वाचनालयापर्यंत काढण्यात आली. यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. व इतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. वाचनालयामध्ये ग्रंथालय, अभ्यासिका, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याकरीता विद्यार्थ्यांना स्वतंत्र बैठक व्यवस्था, गेस्ट लेक्चर सुविधा व इतर पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे संपूर्ण वाचनालयामध्ये सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. वाचनालयासाठी वाचनालय देखरेख समिती स्थापन केली असून, वाचनालयाचे सभासद होण्याकरीता नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत व सभासदांना वाचनालयाचे ओळखपत्र बंधनकारक केले आहे.
सदर कार्यक्रमात मान्यवरांनी आपले संबोधनातून विद्यार्थी व नागरिकांना शिक्षण व वाचनाविषयीचे महत्व पटवून दिले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी “एक गाव एक वाचनालय” ही संकल्पना मांडत आपल्या भाषणामध्ये सांगीतले की, वाचनाशिवाय आता प्रगती होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती जोपासली जावी व भविष्यात स्पर्धा परिक्षेची तयार करुन यशाचे शिखर गाठावे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच शहरातील वाचनालयापेक्षा अधीक सुसज्ज वाचनालय कोटगुल वासीयांनी तयार केल्याबद्दल संपूर्ण नागरिकांचे हार्दीक अभिनंदन करुन भविष्यात पोलीस प्रशासन आपल्या प्रत्येक कार्यात पुढाकार घेतील असे आश्वासन दिले. तसेच विशाल भेदुरकर सा. पुणे यांनी त्यांचे जिवनातील खडतर अनुभव सांगून कोटगुल क्षेत्रातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना फ्री ऑनलाईन क्लासेस व उत्कृष्ट दोन विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांचे पुणे येथील ज्ञान ज्योती अकादमी येथे निवासी स्पर्धा परिक्षेची मोफत तयारी करुन देण्याचे आश्वासन दिले. यानंतर झालेल्या मेळाव्यात वाचनालयाचे ओळखपत्र काही युवक-युवतींना प्रदान करण्यात आले. सोबतच आयोजीत केलेल्या मेळाव्यामध्ये दिव्यांग नागरिकांना बससवलत व यूडीआईडी कार्ड व शेतकऱ्यांना बी-बियाने वाटप करण्यात आले. यासोबतच मेळाव्यादरम्यान विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर करीत रा. रा. पो. बल गट क्र. ०४ नागपूर येथिल अंमलदारांनी मुकनाट्याचे माध्यमातून “सर्वधर्म समभावचा” संदेश दिला.
सदर लोकार्पण सोहळ्यास गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा. तसेच डॉ. विशाल भेदूरकर, वित्त लेखा अधिकारी, संस्थापक ज्ञानज्योती, पुणे, सतिश उमरे, ला.प्र.वि. अमरावती, श्रावणजी मातलाम, माजी सभापती, पं.स. कोरची, कु. मंजुषा कुमरे, सरपंच कोटगुल, कु. गुलशन नैताम, सरपंच सोनपूर, हरिषजी टेकाम, वैद्यकिय अधिकारी कोटगुल, नसरुद्दीन भामानी कोरची, राजेशजी नैताम, माजी सरपंच कोटगुल, झुल्फीकार खेतानी, माजी सरपंच कोटगुल, तसेच परिसरातील सर्व पोलीस पाटील व प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा साहील झरकर, पोमकें कोटगुल प्रभारी अधिकारी आनंद जाधव, पोउपनि नरेंन्द्र पिवाल, पोउपनि खिरडकर, पोउपनि पवार पोमकें कोटगुल येथील सर्व अंमलदार, रा.रा.पो. बल गट क्र. ०४, नागपूरचे अधिकारी / अंमलदार व तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

(The Garvishva) (Gadchiroli News Updates) (Kotgul Korchi) (Sp Nilotpl) (Kotgul Library)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here