The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ४ जानेवारी : नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघाच्या निवडणूका घोषित केल्याने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी आचारसंहितेमुळे पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहे असे माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.
सन २०२२-२३ या वर्षाचे ५० वे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन १० डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या दरम्यान आयोजित करण्याचा प्रस्ताव होता. परंतु भारत निवडणूक आयोगाने २९ डिसेंबर २०२२ च्या प्रसिद्धी पत्रकानव्ये विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघ नागपूर विभागातील निवडणुका घोषित केल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधान परिषदेचे शिक्षक मतदार संघ नागपूर विभाग यामध्ये तात्काळ निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सन २०२२- २३ या वर्षातील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत घेण्यात येऊ नये विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्याबाबतच्या सूचना आपणास आचारसंहितेच्या कालावधी संपल्यानंतर लगेच कळवण्यात येईल असे माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी २ जानेवारी २०२३ रोजी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.
