गडचिरोली : खंडणी वसुल करणाऱ्या नक्षल समर्थकांना अटक

1934

– पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli), २७ नोव्हेंबर : नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या (PLG Week of Naxals) पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस (Gadchiroli Police) दलाने कारवाई करत खंडणी वसुल करणाऱ्या १० नक्षल समर्थकांना अटक करण्यात आली आहे.
उप पोलीस स्टेशन पेरमिली (Permili) हद्दीत बांडिया नदीच्या पुलाचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी जाऊन भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी दक्षिण गडचिरोली डिवीजन कमिटी या मथळयाचे लेटरहेड दाखवुन ७० लाख रुपयांची मागणी केली व ती मागणी पुर्ण न केल्याने ५ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ३.१५ वाजता एकाचे अपहरण करून चंद्रा जंगल परीसरामार्गे रापल्ले जंगल परीसरामध्ये नेले व पुलाचे काम करायचे असेल तर ७० लाख रुपये तीन दिवसांत दया, नाहीतर तुमच्या कंपनीच्या साहीत्याची जाळपोळ करुन तुम्हाला जिवानिशी ठार करु अशी धमकी देवून खंडणी मागितली अशी फिर्यादीने उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे तोंडी रिपोर्ट दिली असता पोलिसांनी गुन्हा नोंद करून गोपनिय सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार तपास केला असता नक्षल समर्थकांनी नक्षल्यांच्या वतीने नक्षली पेहराव करुन बनावट नक्षली कॅम्प तयार करुन स्वत:जवळ असलेल्या भरमार बंदुकीचा धाक दाखवुन ही खंडणीची मागणी केली.
चैन कोम्मा आत्राम (३९) रा. आलदंडी, दानु जोगा आत्राम (२९) रा. आलदंडी, शामराव लखमा वेलादी (४५) रा. चंद्रा, संजय शंकर वेलादी (३९) वर्ष रा. चंद्रा, किशोर लालु सोयाम (३४) रा. चंद्रा, बाजु केये आत्राम (२८) रा. येरमनार टोला, मनिराम बंडु आत्राम (४५ ) रा. रापल्ले, जोगा कोरके मडावी (५०) रा. येरमनार टोला, लालसु जोगी तलांडे (३०) वर्ष रा. येरमनार, बजरंग बंडु मडावी (४०) वर्ष रा. मल्लमपल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
२ ते ८ डिसेंबर २०२२ दरम्यान नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा. यांचे नेतृत्वात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. नक्षल सप्ताह दरम्यान नक्षली शासन विरोधी योजना आखुन खंडणी वसुल करणे, रहदारी बंद करणे, नक्षल स्मारक बांधणे, जाळपोळ करणे तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या घटना घडवून आणत असतात. असाच हा प्रकार उपविभाग अहेरी अंतर्गत उपपोस्टे पेरमिली हद्दीत नक्षल्यांच्या वतीने खंडणी वसुल करण्यात येणार होती. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने हा डाव उधळत अटक केली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा (Sp Nilotpal), अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा. (Anuj Tare) , अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा. (Kumar Chinta), अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख सा (Yatish Deshmukh), उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर (Amol Thakur) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी धवल देशमुख, पोउपनि अजिंक्य जाधव, पोउपनि दिपक सोनुने, पोहवा. रामहरी जांभुळे पोहवा रविंद्र बोढे, पोशि. राहुल खार्डे, पोशि. महेश दुर्गे, पोशि प्रशांत मेश्राम, पोशि. मधुकर आत्राम, पोशि. विवेक सिडाम, पोशि. राकेश उरवेते, पोशि. ब्रिजेश सिडाम यांनी पार पाडली असून, सदर घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

(Gadchiroli News Update) (Gadchiroli News) (Naxal) (Gadchiroli Crime News) (Gadchiroli) (The Gadvishva) (Naxal supporters arrested) (Gadchiroli Police ) (Permili Naxal Arrest)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here