– आमदार कृष्णा गजबे यांचे वनविभागांतील अधिकाऱ्यांना निर्देश
The गडविश्व
देसाईगंज, २४ सप्टेंबर : तालुक्यातील बोळधा, रावणवाडी जंगल परिसरात व गावालगत हत्तीच्या कळपाने काल प्रवेश करीत शेतशिवारातील धान्य पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली असुन शेतकरी बांधवांचे हाती आलेले धान्यपिक निस्तनाबूत झाले आहे. त्यामूळे वन विभागाने तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत करावी असे निर्देश आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
झालेल्या धान्य पिकांच्या नुकसानी संदर्भात माहिती शेतकऱ्यांनी आमदार कृष्णा गजबे यांना दिली. आमदार गजबे यांनी लगेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करुन संबधित अधिकारी यांना पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याच्या सुचना केल्या.
या हत्तीच्या नुकसानीमध्ये बोळधा येथील दिना सितकुरा मेश्राम व गोपाल वाघाडे अशा अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमालाची फार मोठी नुकसान केल्याने वन विभागाने तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याचा सूचना दिल्या.
यावेळी मोहन पा गायकवाड, ओमप्रकाश गायकवाड, शालिक शेंद्रे, नामदेव मेश्राम, वन विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.
