गडचिरोली जिल्ह्यात 70.60 टक्के मतदानाची नोंद : आरमोरी व वडसा आघाडीवर

22

गडचिरोली जिल्ह्यात 70.60 टक्के मतदानाची नोंद : आरमोरी व वडसा आघाडीवर
The गडविश्व
गडचिरोली, दि.०३ : नगरपरिषद निवडणूक–२०२५ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, वडसा (देसाईगंज) आणि गडचिरोली या तिन्ही नगरपरिषद क्षेत्रांमध्ये आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात सरासरी 70.60 टक्के इतके समाधानकारक मतदान नोंदविण्यात आले.

आरमोरीत सर्वाधिक 72.85% मतदान

आरमोरी नगरपरिषद मतदारसंघात एकूण 22 हजार 999 मतदारांपैकी 16 हजार 755 मतदारांनी मतदान केले.
त्यात 11,792 पुरुष आणि 11,207 महिला मतदार होते. यापैकी 8,271 पुरुष व 8,484 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आरमोरीत 72.85% मतदान नोंदले.

वडसा (देसाईगंज) येथे 72.48% प्रतिसाद

वडसा मतदारसंघात एकूण 26 हजार 352 मतदारांपैकी 19 हजार 101 मतदारांनी मत चोख बजावले.
पुरुष मतदार 12,763 असून त्यातील 9,449, तर 13,589 महिला मतदारांपैकी 9,652 जणांनी मतदान केले. यामुळे वडसात 72.48% मतदान झाले.

गडचिरोलीत 68.26% मतदान

गडचिरोली नगरपरिषद मतदारसंघातील 43 हजार 513 मतदारांपैकी 29 हजार 702 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.
यात 14,593 पुरुष, 15,107 महिला आणि 2 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून येथे 68.26% मतदान नोंदले.

जिल्ह्याचा एकूण आकडा

जिल्ह्यातील 92 हजार 864 पैकी 65 हजार 558 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
यात 32,313 पुरुष, 33,243 महिला आणि 2 तृतीयपंथी मतदारांचा सहभाग आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असून निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #election

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here