ग्यारापत्ती येथे ११३ केंद्रित बटालियनच्या वतीने लावण्यात आले ६ सोलर पॅनल

176

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २ एप्रिल : तालुक्यातील ग्यारापत्ती येथे ११३ बटालियन केंद्रीय रिझर्व्ह पुलिस फोर्स च्या वतीने अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात सिविक एक्शन प्रोग्राम २०२२-२३ अंतर्गत ३० मार्च २०२३ रोजी सहा सोलर पॅनल लावल्यात आले.
यावेळी ११३ बटालियन सीआरपीएफ अधिकारी अनिल शर्मा द्वितीय कमान अधिकारी, सय्यद कईम अब्बिस सहाय्यक कमांडो, तसेच पोलीस मदत केंद्र ग्यारापती प्रभारी अधिकारी शिवाजी फोफले, ग्राम पंचायत ग्यारापत्ती बुद्धाराम धानसिंग अचले, इटारमारका चे सरपंच भगतसिंग बी तुलावी तसेच गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.
जसवीर सिंग कमांन्डेन्ट ११३ बटालियन ने उपस्थित असलेल्या ग्रामवासी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपल्या समाजाचे योगदान देण्याचे आवाहन केले. ११३ सी. आर .पी. एफ द्वारा वेळोवेळी अनेक प्रकारचे जनहित प्रोग्राम केलेले आहे .ज्यात ग्रामीण भागातील अनेक लोकांनी लाभ घेऊन भविष्य चांगले बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लाभ घेतलेल्या ल्याभार्थानी ११३ बटालियनच्या तुकडीचे आभार मानले. सोलर पॅनलमुळे ग्यारापत्ती ग्रामवासियांना प्रकाश उपलब्ध झाला असून रात्री लोकांना होणारा त्रास रोखण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. ग्रामीण भागातील लोकांना कल्याणकारी योजना लोकांपर्यंत निश्चितच पोहचविल्या जाणार आहेत. यावेळी आश्रम शाळा येथील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा मध्ये लोकनृत्य सादर करुण उपस्थित लोकांनी मन जिंकून घेतले. लोकनृत्याला ग्रामवासिनी कमांडर ११३ बटालियन के च्या वतीने त्यांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.

(The gadvishva) (The gdv) (Gadchiroli post office Rangi dhanora)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here