धानोरातील विक्रेत्याकडून ५६ हजारांची देशी-विदेशी दारू जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : धानोरा शहरातील वॉर्ड क्रमांक ४ येथील अवैध विक्रेत्याच्या घरावर धाड टाकून ५६ हजार रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त केल्याची कारवाई धानोरा पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली. याप्रकरणी संबंधित दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धानोरा शहरातील वार्ड क्रमांक ४ मध्ये एक इसम अवैधरित्या दारूविक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाली. प्राप्त माहितीच्या आधारे संबंधित दारू विक्रेत्यावर पाळत ठेवली होती. अशातच धानोरा पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या संबंधित दारूविक्रेत्याच्या घरावर धाड टाकून तपासणी केली असता, देशी-विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी विक्रेत्याच्या घरातून जवळपास ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे धानोरा शहरातील दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असून शहरातील दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी पाळत ठेवली आहे.
सदर कारवाई पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे, पोलिस शिपाई भजनराव गावडे, पोलिस शिपाई राहूल वणकर, पोलिस शिपाई मारोती वाडगुरे, पोलिस शिपाई सुलचना चव्हाण यांनी केली. या कृतीमध्ये मुक्तीपथ तालुका संघटक राहूल महाकुलकर, भास्कर कड्यामी, बुधाताई पोरटे सहभागी होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #muktipath )