राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये गडचिरोली जिल्हयात १० हजाराहून अधिक प्रकरणांची सुनावणी

358

लोकन्यायालतील तडजोडीने मानसिक समाधान मिळते – मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश : यु.बी.शुक्ल

The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व गडचिरोली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोलीमध्ये राष्ट्रीय लोक अदालीचे नियोजन यशस्वीरीत्या संपन्न झाले. या लोकन्यायालयात जिल्हयातील १०४०० प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. यावेळी मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधीकरण यु.बी.शुल्क यांनी अशा लोक अदालती मुळे सर्व सामान्य जनतेचा वेळ वाचतो, त्याचे पैसे वाचतात यामूळे सर्वांना मानसिक समाधान मिळत असल्याचे मत व्यक्त केले. यामुळे न्याय प्रक्रियेला अनेक महत्वाच्या तसेच गरजू प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यास सहाय्य मिळेल असेही पुढे सांगितले. त्यांनी जनतेला यावेळी आवाहन केले की, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अशा लोकन्यायालयात सहभाग नोंदवून आपसी तडजोड करण्यास उपस्थित रहावे. या लोक अदालती वेळी गडचिरोली विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव डी.डी.फुलझेले यांनी समझोता केलेल्या पक्षकारांचे आभार मानले व त्यांचे अभिनंदन केले.
गडचिरोली जिल्हयातील न्यायालयात दाखल प्रलंबित ९०० प्रकरणे लोक अदालीमधे ठेवण्यात आली होती. यात प्रामुख्याने कौटुंबिक, आर्थिकवाद, फौजदारी तक्रारी की ज्यावर आपसी तडजोड होवू शकते यांना ठेवण्यात आले होते. तसेच दाखलपुर्व ९५०० प्रकरणे आपसी तडजोडीसाठी ठेवण्यात होती. अशाप्रकारे १० हजाराहुन अधिक प्रकरणांवर लोक अदालती मध्ये सुनावणी झाली.
सर्व सामान्य लोकांना अचानक वादविवाद, तक्रारीमुळे अनेकदा न्यायालयाची पायरी चढावी लागते अशावेळी गोरगरीब, गरजू लोकांना लोक अदालतीचा महत्त्वपुर्ण फायदा होतो. यामध्ये विविध बँकांमधील, वीज वीतरण कार्यालयातील प्रलंबित प्रकरणे तातडीने विभागांतर्गतही अनेक दंडात्मक कारवाई केलेली प्रकरणे अशा लोक अदालती मध्ये सोडविली जातात.

लोक अदालती मधे सर्वच ठिकाणी आढळली गर्दी

आपसी समझोता करण्यासाठी आयोजित लोक अदालतीमध्ये पक्षकारांनी चांगलीच गर्दी केलेली आढळली. जिल्हा सत्र न्यायालय व तालुका न्यायालयात ठेवण्यात आलेल्या बहुतेक सर्वच पक्षकारांनी हजेरी लावून सुनावणी पुर्ण केली. सुनावणीस लागलेल्या रांगा व न्यायालय परिसरात उपस्थित संख्येवरुन मोठया प्रमाणात आपसी तडजोड करण्यास नागरिक उत्सुक असल्याचे आढळून आले.

जिल्हयातील आपसी समझोता झालेल्या कुटुंबांचा न्यायाधीशांकडून सन्मान

कौटुंबिक वाद विवादामध्ये आपसी समझोता झाल्यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा सचिव यांनी त्या त्या कुटुंबाचे साडी व पुष्प गुच्छ देवून सन्मान केला. तसेच पुढिल सांसारीक जीवनास शुभेच्छा दिल्या. यामुळे कित्येक प्रकरणे तडजोडीने सोडविलेल्यांचा चेहऱ्यावर आनंद झाल्याचे चित्र दिसून येत होते. अपघातात नुकसान झालेल्या कुटुंबानाही विमा कंपनीबरोबर तडजोड करून काही प्रकरणे निकाली काढण्यात आली. यावेळी संबंधित कुटुंबासह विमा कंपन्यांचा वेळ आणि पैशांची बचत झाली. नुकसानग्रस्त कुटुंबांना आवश्यक भरपाई मिळाली याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here