२५ ला चातगाव येथील ‘सर्च’ रुग्णालयात ‘मेंदुविकार ओपीडी’ व ‘वेदना व्यवस्थापन ओपिडी’

221

The गडविश्व
गडचिरोली, २३ फेब्रुवारी : ‘वेदना व्यवस्थापन ओपिडी’मध्ये मुंबईचे तज्ञ डॉ. जितेन्द्र जैन हे तपासणी व उपचार करतील. या ओपीडी मध्ये पाठीचा कणा दुखणे, पाठदुखी, मज्जातंतू वेदना, लंबर स्पॉन्डिलायसिस: सकाळी कडकपणा, पाठीत वेदना, जास्त वेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे, वाकताना किंवा उचलताना वेदना होणे,मानेचा स्पॉन्डिलायसिस: डोक्याच्या मागील बाजूस डोकेदुखी होणे या सर्वांचा उपचार होईल.तसेच पाय आणि हातांमध्ये अशक्तपणा आणि अवघडलेपणा येणे, मानेत कडकपणा जाणवणे, तोल गेल्यासारखे वाटणे, खांद्यापर्यंत मानेच्या वेदना होणे. पाय आणि खांद्यांमध्ये बधिरपणा येणे, आतडी आणि मूत्राशयावर ताबा ठेवण्यास कठीण होणे, मागे वाकताना पाठीच्या मध्यभागी वेदना होणे, पाठीच्या कण्याची मागे पुढे हालचाल होताना वेदना होणे आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर च्या वेदना या सर्वांवर उपचार होईल.
‘मेंदुविकार ओपीडी’ मध्ये नागपुर येथील तज्ञ डॉ. ध्रुव बत्रा(Neurologist) हे तपासणी व उपचार करतील या ओपीडी मध्ये स्ट्रोक (अर्धांगवायू/पॅरालिसिस) बरोबरच झटक्यांचा(मिरगी)आजार, विविध मज्जातंतू चे आजार, पार्किन्सन आजार, अल्जायमर आजार, जुनाट डोके दुखी, लहान मुलांचे मेंदूचे आजार, चक्कर येण्याचे अनेक आजार, मद्यपाणा मुळे होणारे मेंदुविकार अशा अनेक आजारांवर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळणार आहे.
तसेच ही सुविधा जिल्ह्यातील जनतेसाठी अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जात आहे.अशी सुविधा गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच उपलब्ध होत असून या सुविधेचा नागरिकांनी, विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी जनतेने मोठ्या प्रमाणात लाभ करून घ्यावा असे आवाहन सर्च तर्फे करण्यात आले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (Vinay Gowda) (National Commission for Scheduled Tribes) (Maharashtra DGP Rajnish Seth) (Jiwati Taluka) (Kusumbi) (Muktipath) (IEintracht Frankfurt vs Napoli) (Liverpool FC) (ILent) (Meghalaya) (Rafael Nadal) (The Last of Us episode 6) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (The Gdv)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here