The गडविश्व
गडचिरोली, ३१ डिसेंबर : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील “सर्च” रुग्णालयातील मानसिक आरोग्य विभागाद्वारे अकरा वेगवेगळ्या गावांमध्ये मानसिक आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून एकूण १३३ मानसिक रुग्णांनी उपचार घेतला.
सर्च रुग्णालयातील मानसिक आरोग्य विभागाद्वारे नेहमीच गावपातळीवर मानसिक आरोग्य शिबीर घेण्यात येते. या महिन्यात सुद्धा वेगवेगळ्या ११ गावामध्ये मानसिक आरोग्य शिबीर घेण्यात आले. यात गोटा, पाथरगोटा, तुलमेल, कचकल, पुस्टोला, कोवनटोला, मेंढाटोला, येडमपायली , भापडा, खुटगाव आणि येरंडी या गावातील १३३ मानसिक रुग्णांनी उपचार घेतला. यामध्ये मुख्याता उदासीनपणा, चिंता-चिंता वाटणे, नैराश्य, यावर निदान व उपचार करण्यात आला. व जास्तीत जास्त रूग्णांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. अशा प्रकारच्या एकदिवसीय मानसिक आरोग्य शिबिरांची मालिका पुढे पण सुरू राहणार आहे. हे मानसिक आरोग्य शिबीर सर्च रुग्णालयातील मानसिक आरोग्य विभागाद्वारे आयोजित करण्यात येते. सदर शिबिराचा लाभ परिसरातील गरीब व गरजू रुग्णांनी घ्यावा , असे आवाहन सर्च रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.