‘या’ महिन्यानंतर राज्यात १०० टक्के अनलॉक होण्याची शक्यता

255

The गडविश्व
मुंबई : कोरोनाचा संसर्ग कमी होत येत आहे. तिसरी लाट हि ओसरतांनाही दिसत आहे. त्यामुळे राज्यात मार्चनंतरच शंभर टक्के अनलॉक होण्याची शक्यता आहे. तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतरही दररोज शेकडो रूग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे राज्याच्या टास्क फोर्सने सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे मास्क मुक्तीचा निर्णयही मार्चनंतरच होणार आहे. ब्रिटनमध्ये डेल्टाक्रोनसारखा नवीन व्हेरियंट आढळला आहे. यामुळे अजून थोडावेळ अनलॉक करण्यासाठी घेतला जाणार आहे.
कोरोना निर्बंधात शिथिलता आणण्याच्या सूचना राज्यांना केंद्र सरकारने केल्या आहेत. त्यानुसार हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. दरम्यान, लवकरच कोरोनाच्या (Covid-19) निर्बंधातून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने केंद्राकडून राज्यांना निर्बंध शिथिल करण्याच्या सूचना केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here