The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २८ ऑगस्ट : तालुक्यातील दुधमाळा येथे तान्हापोळा उत्साहात साजरा करण्यात आला.
गेल्या ६-७ वर्षा पासून दूधमाळा या गावात तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन केल्या जाते. नवकिर्ती बहुद्देशीय विकास संस्थेच्या व गुरुदेव भजन मंडळ दूधमाळाचे वतीने तान्हापोळा उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक उत्सव नष्ट होऊ नयेत व गावातील एकता कमी होऊ नये ती कायम टिकून रहावी या उद्देशाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
सुरुवातीला ५ नंदी बैल या उत्सवात सामील व्हायचे आज ती संख्या वाढून ५० पर्यंत पोहचलेली आहे. बालगोपाल त्यांच्याकडील नंदी बैलांची सजावट करून मोठया आनंदात सदर उत्सवात सहभागी होतात. सोबतच गावातील सर्व महिला व पुरुष या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवतात.
कार्यक्रमाची सुरुवात हनुमान मंदिर दुधमाळा येथून सर्व नंदी बैल आणि बालगोपालांची मिरवणूक वाजत गाजत संपूर्ण गावात काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान काही महिलांनी नंदी बैलाचे पूजन केले. गावातून मिरवणूक सरळ मंदिरात पोहचली व त्या ठिकाणी सर्व उपस्थित नंदिना व बाल गोपालांना रांगेत बसवण्यात आले. सजावट केलेल्या नंदी बैलांचे निरीक्षण करून त्यामधून उत्कृष्ट नंदिना प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ असे पारितोषिक देण्यात आले व उर्वरित सर्व सहभागी बालगोपालांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरित करण्यात आले.
गावात अशाच प्रकारचे बरेच उत्सव नवकिर्ती संस्थेच्या वतीने साजरे केले जातात व अशाच कार्यक्रमाचे आयोजन करून गावातील एकोपा टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नरत असून अशाच कार्यक्रमाचे आयोजन नेहमी करू असे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष तथा उपसरपंच यशवंतराव मोहूर्ले आणि अक्षय पेदिवार यांनी केले.
यावेळी सर्व उपस्थितांना खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी सरपंचा कु.सुनंदा ताई तुलावी, उपसारपंच यशवंतराव मोहूर्ले, पोलीस पाटील सौ.लताताई उईके, ग्रा.पं. सदस्या सौ.सुनंदाताई निकुरे, सौ.मंदाताई उईके तसेच बुध्दाजी नैताम, नेताजी जंबेवार, तुळशीराम कोकोडे, एकनाथजी उईके, किसन वाढई, पंढरीजी मेश्राम, दिलीप जंबेवार,मधुकर उईके,श्रीहरी निकोडे,उमेशजी जंबेवार, कैलासजी बोलगमवार, सुखदेव कोकोडे, पुष्पक सेलोकर, अक्षय पेदिवार,मुखरूजी ताटलावार गावातील महिला, पुरुष, बालगोपाल व मंडळाचे सर्व तरुण सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
