The गडविश्व
वडसा (देसाईगंज) : तालुक्यातील चोप येथे तंटामुक्त समितीच्या व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आंतरजातीय प्रेमीयुगुल विवाह बंधनात अडकले. चोप येथील लिलेश्वर नामदेव उईके (२५) वर्ष या मुलाचे प्रेमसंबध चोप येथील संजना सुधाकर शेडमाके (२१) वर्ष या मुलीसोबत गेल्या काही दिवसापासून प्रेम संबंध होते. त्यामुळे या प्रेमीयुगलाने लग्न करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी तंटा मुक्त समिती चोप येथील तंटामुक्ती समिती अध्यक्ष लिलेश्वर पर्वते व समिती यांच्याकडे लग्न लावून देण्यास विनंती अर्ज सादर करुन कागदपत्र सादर केले त्यानुसार दोघेही लग्नायोग्य असून वयाने पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर आज १२ फेब्रुवारी ला त्यांचे लग्न ग्रामपंचायत कार्यालय चोप येथे दुपारी १२ वाजता गावकऱ्यांच्या उपस्थितीत हिंदू धर्माच्या रितिरिवाजानुसार लावण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी नविन जोडप्याला भरभरून आशिर्वाद दिला. यावेळी तंटा मुक्त समिती अध्यक्ष लिलेश्वर पर्वते, सरपंच नितीन लाडे, प्रकाश डोंगरवार, राधेश्याम बरय्या, आत्माराम सूर्यवंशी, कमलेश बारस्कार, तुकाराम तीतीरमारे अरविंद कुथे, गौरव नागपूरकर, शिवाजी ठाकरे, व बहुसंख्य गावकरी यावेळी उपस्थित होते.
