गडचिरोली जिल्ह्यातील कलाकारांचा येतोय अल्बम सॉंग

456

The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli) २० सप्टेंबर : जिल्ह्यातील कलाकारांना अभिनय क्षेत्रात वाव मिळावा म्हणून मिसेस इंडिया २०२१ मनीषा मडावी, शितल मेश्राम कोसे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट गडचिरोली व आर आर प्रोडक्शन, ड्रीम टाऊन फिल्म स्टुडिओ तळेगाव पुणेचे चालक डिरेक्टर & ऍक्टर राहुल रेड्डी यांच्या प्रयत्नाने अल्बम सॉंग च्या चित्रीकरणाचा शुभारंभ नुकताच गडचिरोली जिल्ह्यात करण्यात आला. (New album Song Gadchiroli Acctors)
अल्बम सॉंग चे चित्रीकरण गडचिरोली जिल्ह्यातील सावरगाव, बोदली मेंढा व गडचिरोली शहरात करण्यात आले. या गाण्यातमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील गरीब परिस्थितीतील आदिवासी मुले राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोण कोणत्या परिस्थितीला तोंड देऊन सामोर जावे लागते याचे जिवंत दाखले दाखवण्यात आलेल्या या गाण्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर गडचिरोली जिल्ह्यातील स्पर्धकांचा संघर्ष बघायला मिळणार आहे. या अल्बम सॉंग मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील कलाकारांचा सहभाग असून अप्रतिम असे अभिनय कौशल्य दिसणार आहे.
या अल्बम सॉंग मध्ये मुलांच्या भूमिकेत वेदांत वराटकर (९) गडचिरोली रियांश दहीकर (८) गडचिरोली ,आईच्या भूमिकेत अन्नपूर्णा प्रभुदास शिडाम मेश्राम वनरक्षक (३३) गडचिरोली तर ग्रुप लीडर च्या भूमिकेत स्वतः मनीषा मडावी मिसेस इंडिया २०२१, संघर्ष करणाऱ्या स्पर्धकांच्या भूमिकेमध्ये आकर्षण विलास नैताम (१४) गडचिरोली, अवनी विलास नैताम (११) गडचिरोली , श्रावणी विठ्ठल उईके (१७) कुरखेडा, कांचन मधुकर कन्नाके कोवे वनरक्षक (२८) आष्टी, दिपक इंद्रशहा भुके बंजारावूड फिल्म (२२) गोकुळ नगर गडचिरोली, उदय नरोटे (२८), पल्लवी नरोटे (३०) गडचिरोली यांचा सहभाग असून हा सॉंग लवकरच टीव्हीवर पाहायला मिळणार आहे असे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here