The गडविश्व
दिभना, १२ ऑगस्ट : तालुक्यातील जेप्रा येथे आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतगर्त किसान विद्यालयातील विद्यार्थीनीनी प्राथमिक आरोग्य पथक जेप्रा येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना राखी बांधून कोविड -१९ सत्रातील कोविड योध्दांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आरोग्य अधीकारी डॉ.सुब्रत मंडल तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पं.स.सदस्य नेजाजी गावतूरे, डॉ, मोनाली केवटे, सी.एच.ओ रईतवारी, श्रीमती नंदनवार, श्रीमती पराते, आशा वर्कर सविता जेंगटे, तसेच सर्व आरोग्य कर्मचारी तथा किसान विद्यालयाचे शिक्षक व्ही एम, मेश्राम, सी जी खोब्रागडे, ऊज्वला तायडे आणि विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन तथा आभार विनोद गोबाडे यांनी पार पाडले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षीका तसेच प्रा. आरोग्य पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
