– पालकांची प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदनातुन मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २० सप्टेंबर : एकलव्य आदिवासी विकास विभाग प्रकल्प अंतर्गत प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले परंतु चामोर्शी येथे शाळा सुरु करण्याकरिता इमारत व वसतीगृह उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले. त्यानंतर शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळा गडचिरोली येथील इमारतीत एकलव्य मॉडेल रेसिडेंटल स्कूल चामोर्शी सुरु केले परंतु इमारत व शिक्षका अभावि विद्यार्थ्यांची होनारी पिळवणूक थांबविण्याची मागणी पालकांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांना १९ सप्टेंबर २०२२ ला दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे आमचे ५५० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित आहेत. येथील शाळा सध्या शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळा गडचिरोली येथे आहे. गडचिरोली येथील प्रकल्पा अंतर्गत असलेल्या शासकीय इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये चामोर्शी एकलव्य शाळेचे वर्ग १ ते ४ आहेत. शाळेचे अंदाजे ५५० विद्यार्थी असुन वर्ग खोली नसल्यामुळे चारही वर्ग एकत्र बसविल्या जाते तेही व्हरांड्यात खाली बसुन शिकविण्या करिता शिक्षकच नाहीत असेही निवेदनात म्हटलेले आहे.
शैक्षणिक सत्र सुरु होवून दोन महीने झाले तरीही मुला-मुलींना कोणतेही शिक्षण दिले जात नाही. शाळेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिजे त्या प्रमाणात नाही असा पालकांचा आरोप आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावलेला नाही त्यांच्या वयानुसार शिक्षणाची प्रगती दिसून येत नाहीत त्यामुळे मुला-मुलींची अडचण निर्माण होत आहे. विद्यार्थी एकत्र कोंबल्यासारखे ठेवल्या जाते. झोपायला पण बेड नाही, विद्यार्थी जमिनीवर झोपतात, पाण्याची सुविधा नाही, लहान मुले आंघोळ आणि संडास, बाथरुम करिता वरच्या मजल्यावर पायऱ्या चढून पाणी नेतात. कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे दोन वर्ष शिक्षणा अभावी गेले आता दोन महिने उलटूनही शाळेतील विद्यार्थीना नाममात्र वर्गात बसविल्या जाते. एकंदरीत शाळेतील विद्यार्थ्याना इमारत, विद्युत पुरवठा, झोपण्याची व्यवस्था तेथिल इमारतीत होतो तर येथील निधी खर्च होतो कुठे हा मात्र संशोधनाचा विषय आहे. याचा शोध घेवुन संबंधित विभागाने येथील शाळेकडे लक्ष देऊन मुलांच्या शिक्षणाच्या दर्जा वाढविण्यात यावा, येथील सुविधा १० दिवसात उपलब्ध करून पालकांचे समाधान झाले नाहीतर तिव्र आदोलन करण्याचा इशारा यशवंत गेडाम, विनोद वट्टी, सुरेश उसेंडी, जगदिश मसराम, सुरेश उसेंडी, कोमल जुमनाके, दिनकर शेडमेक, श्रीराम मडावी, तुळशिदास मडावी, अक्षय उसेंडी, सुनिता कुमरे, नुतन मसराम, विनोद कन्नाके, सेजल उसेंडी या पालकांनी दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.
