ॲक्सिस बँक प्रकरणी देवेंद्र फडणवीसांना बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने बजावली नोटिस

157

– चार आठवड्यात उत्तर देण्याचे कोर्टाचे आदेश

THE गडविश्व
नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पोलिसांच्या पगाराच्या खात्याबाबतच्या केसमध्ये नोटीस बजावली आहे. या प्रकरणात फडणवीस यांना चार आठवड्यात उत्तर द्यायला सांगितले आहे.
2019 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा तमोहनीश जबलापुरे नावाच्या व्यक्तीने त्यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका केली होती. मुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करून फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस ज्या ॲक्सिस बँकेत उच्च पदावर नोकरीला आहेत, त्या बँकेला फायदा पोहचवण्याचा प्रयत्न केला, असे त्यांचे म्हणणे आहे. याचिका दाखल होण्यापूर्वी हायकोर्टाने फडणवीसांना नोटीस बजावली होती. जी पत्ता बदलल्यामुळे त्यांच्यापर्यंत तेव्हा पोहोचू शकली नाही. दरम्यानच्या काळात यामध्ये पुढे काही झाले नाही. आता परत एकदा याचिका दाखल करण्याअगोदर पत्ता सुधारित करून ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here