५१ रुग्णांना नको दारूचे व्यसन

202

-तालुका क्लिनिकला दिली भेट
The गडविश्व
गडचिरोली, ८ ऑक्टोबर : दारूचे दुष्परिणाम लक्षात येताच, विविध तालुक्यातील ५१ रुग्णांनी दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी आपल्या तालुका मुख्यालयातील क्लिनिकला भेट देऊन उपचार घेतला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दारूमुक्त होण्याची इच्छा असलेल्या रुग्णाना उपचार मिळावे यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे नियोजित दिवशी तालुका मुख्यालयी क्लिनिकचे आयोजन केले जाते. आतापर्यंत अनेक रुग्णांनी क्लिनिकला भेट देत पूर्ण उपचार घेतला. मागील आठवड्यात शुक्रवारी अहेरी ११, चामोर्शी १०, सोमवारी आरमोरी २१ व एटापल्ली ९ अशा एकूण ५१ रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे. क्लिनिकला येणाऱ्या रुग्णांना दारूमुक्त होण्यासाठी मदत मिळावी, यासाठी औषोधोपचारासह समुपदेशन देखील करण्यात येते. रुग्णांना दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती देत समुपदेशन करण्यात आले. रुग्णांची केस हिष्ट्री घेत दारूचे दुष्परिणाम सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here