४७ रुग्णांचा व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार

134

-विविध गावात शिबीर
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील खमणचेरु, कामतळा, कुकडी, विसोरा या गावांमध्ये गाव पातळी व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून उपचार घेत ४७ रुग्णांनी व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे. मुक्तिपथ अभियानाच्या या उपक्रमामुळे गावातच गरजूना उपचार घेणे सोईस्कर ठरत आहे.
अहेरी तालुक्यातील खमणचेरु येथील शिबिरात १० रुग्णांवर उपचार करण्यात आला. साईनाथ मोहुर्ले यांनी रुग्णांचे समुपदेशन केले तर पूजा येल्लुरकर यांनी केस हिष्ट्री घेतली. शिबिराचे नियोजन तालुका संघटक केशव चव्हाण यांनी केले. यशस्वीतेसाठी सरपंच शायलू मडावी, अंगणवाडी सेविका कमल मांदाळे, तालुका प्रेरक आनंद कुम्मरी यांनी सहकार्य केले. धानोरा तालुक्यातील कामतळा येथे ११ रुग्णांवर उपचार करण्यात आला. नियोजन तालुका उपसंघटक भाष्कर कड्यामी यांनी केले.यावेळी गाव पाटील देवसाय गावडे, मनिराम आतला, लालसाय गावडे, राजिराम गावडे यांच्यासह गाव संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथील १३ जणांनी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचे नियोजन तालुका प्रेरक अनुप नंदगिरवार यांनी केले. यावेळी सरपंच रमेश कुथे, पोलिस पाटील भामिला सहारे, अंगणवाडी सेविका नाकतोडे, विमल ठाकरे, सुपरवायझर जक्कनवार व गाव संघटनेने सहकार्य केले. आरमोरी तालुक्यातील कुकडी येथे आयोजित शिबिरातून १३ रुग्णांवर उपचार करण्यात आला. दोन्ही शिबिरात प्राजु गायकवाड यांनी रुग्णांचे समुपदेश केले तर संयोजक प्रभाकर केळझरकर यांनी रुग्णांना धोक्याचे घटक सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here