४७ जणांची व्यसनातून बाहेर पडण्याची इच्छा

247

The गडविश्व
गडचिरोली, ३१ जुलै : स्वतःचे पैसे खर्च करून आपण दारूच्या माध्यमातून विविध आजार विकत घेत असतो. दारू सेवनामुळे स्वतःबरोबर कुटुंबही व्यथित होत असल्याचे लक्षात येतात जिल्ह्यातील ४७ व्यसनी रुग्णांनी दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या रुग्णांनी मुक्तिपथद्वारे विविध तालुका मुख्यालयी आयोजित क्लिनिकच्या माध्यमातून उपचार घेतला आहे.
दारूचे व्यसन हे एक मानसिक आजार आहे. यातून मुक्त होण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. जिल्हाभरातील अशा रुग्णांना तालुकास्थळी उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यासाठी १२ ही तालुक्यात व्यसन उपचार क्लिनिक सुरु करण्यात आले. यामुळे शहरी, ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील रुग्णांना सुद्धा उपचार घेणे सुलभ झाले आहे. बुधवार देसाईगंज २१, गुरुवारी एटापली २२ व मुलचेरा तालुका क्लिनिकमध्ये ४ रुग्णांनी भेट दिली. विविध तालुक्यातील एकूण ४७ रुग्णांनी दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तालुकास्थळावरील क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांवर उपचार करीत त्यांना समुपदेशन सुद्धा करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here