The गडविश्व
गडचिरोली : सन २०२१-२२ या सत्रात १२ शाखेतील (अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमावव विमाप्र) उमेदवारांनी जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव ३१ डिसेंबर २०२१ रोजी पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली येथे सादर केलेले होते ते सर्व प्रकरण निकाली काढण्यात आलेले आहेत. (त्रृटीचे प्रकरण वगळून) तरी १२ वी शाखेतील विद्यार्थानी स्वत:चा ई मेल आय.डी.वर व बार्टी कार्यालयाचे https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून आपली जात वैधता प्रमाणपत्राची रंगीत कॉपी काढळून घ्यावी परंतु ज्यांना अद्याप पर्यंत ई-मेल व्दार जात वैधता प्रमाणपत्र मिळालेली नसल्यास सदर प्रस्तावामध्ये जाती दावा सिध्द करणारे सबळ पुरावे नसल्याने त्यांचे प्रकरण त्रृटीमध्ये असल्याने त्यांना यापुर्वी दुरध्वनी, भ्रमणध्वनी व पत्राव्दारे त्रृटी पूर्तता करणेसंदर्भात कळविण्यात आले आहे.
मात्र ज्या अर्जदारांनी अद्यापही त्यांचे जाती दावे पडताळणी संबंधीत आवश्यक ते मानीव दिनांकापुर्वीचे जातीचे व वास्तव्याच्या नोंदीचे पुरावे सादर केलेले नाहीत. अशा अर्जदारांना उमेदवारांना त्रुटी पुर्ततेकरीता संधी देण्यात येत असून, त्यांनी त्रृटी पुर्तते बाबत आवश्यक ते पुरावे मुळ प्रतीसह सादर करणेसाठी कळविण्यात आले आहे. त्रुटीपुर्ततेकरीता सबळ पुराव्यासह समिती कार्यालयात दर मंगळवारला उपस्थित राहावे.
ज्या अर्जदारांचे जात वैधता प्रमाणपत्र तयार होऊनही ज्यांनी अद्याप समिती कार्यालयात जमा असलेली मुळ जात प्रमाणपत्र नेलेले नाही, त्यांचे पालक वा सख्खे भाऊ, बहिन यांनी अर्जादाराचे व स्वत:चे ओळखपत्र (मुळ व झेरॉक्स), जातवैधता प्रमाणपत्राची झेरॉक्स घेऊन तात्काळ मुळ जात प्रमाणपत्र प्राप्त करावे. तसेच सन-२०२१-२२ सत्रातील १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी आजपर्यत जात वैधता प्रमाणपत्राचा प्रस्ताव विहीत नमून्यातील ऑनलाईन अर्ज व आवश्यक दस्ताऐवजासह समिती कार्यालयास सादर केलेली नाही, अश्या विद्यार्थ्यांनी दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्रस्ताव कार्यालयीन वेळेत सादर करावे. असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली देवसुदन धारगांवे यांनी केले आहे.