३० वनमजुरांनी काढला प्रत्येकी १० लाखांचा अपघात विमा

299

– सामाजिक वनीकरण विभागाचा स्तुत्य उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, १७ सप्टेंबर : वनपरीक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनिकरण व पोस्ट ऑफिस, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने वनमजुरांसाठी अपघात विमा काढण्याचा कार्यक्रम आज १७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ३० वनमजूरांनी प्रत्येकी १० लाखांचा अपघात विमा काढला.
इंडियन पोस्ट व टाटा ए.आय.ए. यांच्या ‘ग्रूप ॲक्सिडेंटल गार्ड’ (अपघाती सुरक्षा विमा) योजनेतून फक्त ३९९ रुपयांमध्ये प्रत्येक मजुरांचा १० लाख रुपयांचा विमा काढण्यात आला. या योजनेत ज्यांना विमा हवा आहे त्या प्रत्येकाचे इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक सेव्हिंग अकाउंट मध्ये खाते उघडणे आवश्यक आहे. नवीन खाते उघडण्यासाठी किमान २०० रु व विम्याचे ३९९ असे एकूण ६०० रुपये भरून हा विमा काढता येतो.

या कार्यक्रमासाठी व विमा काढण्यासाठी प्रामुख्याने इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक, गडचिरोलीचे ब्रांच मॅनेजर आकाश वाहाणे, विकास कोतपल्लीवार, गौरव गाडे, धीरज राठोड इ. उपस्थित होते.

वनविभागाच्या कामांवर येणाऱ्या हंगामी/रोजंदारी मजूरांना शासनाच्या कर्मचाऱ्यांना असलेले फायदे मिळू शकत नाहीत, तसेच रोजच्या धकाधकीच्या व अनिश्चिततेच्या जीवनात अपघात विमा कवच असणे काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने किमान हा विमा काढण्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक वनीकरणचे वनक्षेत्रपाल धीरज ढेंबरे यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी सामाजिक वनिकरन परीक्षेत्र गडचिरोलीच्या वनपाल कु. विद्या उइके, वनपाल वासुदेव बोगा, वनपाल नीलकंठ वासेकर, वनपाल संतोष देगावे, व वनरक्षक विवेक अलोणे, वनरक्षक कु. मेश्राम, मनोज पिपरे, रवी भांडेकर इ. उपस्थित होते..

वनपरिक्षेत्र कार्यालयाचे लिपिक नितेश सोमलकर यांनी पोस्ट बॅंकेच्या अधिकाऱ्यांचे तसेच सर्व मजुरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

विमा योजनेची वैशिष्ट्ये

अपघाती निधन झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास वारसदाराला १० लाख रुपये. तसेच दोन मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रूपयांची वेगळ्याने तरतूद आहे. शिवाय बाह्यरुग्णासाठी ३० हजार व आंतररुग्णासाठी ६० हजार रुपये उपचार खर्च मिळतो. तसेच मृत्यू झाल्यास वारसांना अंत्यसंस्कारासाठी ५ हजार रुपयांची तरतूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here