The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २१ सप्टेंबर : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे २३ सप्टेंबर २०२२ ला सकाळी १०.०० वाजता कर्करोग तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात गर्भाशय कर्करोग, स्तन कर्करोग व तोंडाचा कर्करोग इत्यादी रोगाविषयी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील तज्ञ डॉक्टर तपासणी व निदान करण्यात येणार आहे. कर्करोग हा १०० हूण अधिक भिन्न आणि स्थळ रोगांचा एक गट आहे. कर्करोगाची संभाव्य लक्षणे म्हणजे थकवा, अकारण वजन कमी होणे, सतत ताप येणे, मल विसर्जन प्रक्रियेत बदल, असामान्य रक्तस्त्राव किंवा स्त्राव घट्ट होणे किंवा गुठळ्या होणे, पुरुषांमध्ये सर्वसामान्य लक्षणे कर्करोग तोंडाची पोकळी, फुफ्फुस, अन्ननलिका आणि पोट, स्त्रियांमध्ये सर्वसामान्य कर्करोग गर्भाशय, स्तन, तोंडाची व पोकळी इत्यादी रोगासंबंधी तपासणी तालुक्यातिल सर्व नागरिकांनी करून घ्यावी असे वैद्यकीय अधीक्षक तालुका आरोग्य अधिकारी धानोरा यांनी आवाहन केले आहे.
