कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १९८ शेतकऱ्यांचा होणार सन्मान

176

-१ व २ मे रोजी पुरस्काराचे होणार वितरण

The गडविश्व
गडचिरोली : कृषी मंत्री,ना.दादाजी भूसे यांच्या संकल्पनेतून सन 2017,2018 व 2019 या वर्षासाठी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करण्याऱ्या 198 शेतकरी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार विजेतांना मा.राज्यपाल,भगतसिंगजी कोशारी,व मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्याकरीता राज्यस्तरीय कृषि पुरस्कार वितरण साहेळा 2 मे 2022 रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, दिंडोरी रोड,म्हसरुळ, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर 1 मे 2022 रोजी त्याच ठिकाणी कृषि मंत्री,दादाजी भुसे, यांच्या विशेष उपस्थितीत कृषि क्षेत्रातील महिलांचा सहभाग याबाबतचा कृषि मेळावा घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here