१५ सप्टेंबर ला सर्च येथे कर्करोग ओपीडी

139

The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli), १३ सप्टेंबर : गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन कर्करोग वर उपचार घेता येणे कठीण होते. परंतु कॅन्सरच्या वाढत्या संख्येमुळे ‘सर्च’ गडचिरोलीत (serch Garchiroli) कॅन्सरची ओपीडी (cancer opd) सुरू करण्यात आली आहे. या सेवांची गरज असलेल्या समाजातील प्रत्येक सदस्याने माँ दंन्तेश्वरी रुग्णालयात येऊन या नवीन पिढीच्या सेवांचा लाभ घ्यावा असर आवाहन करण्यात आले आहे. येत्या १५ सप्टेंबर २०२२ ला कर्करोग ओपीडी आयोजीत करण्यात आली असून हि ओपीडी सेवा नागपुरचे प्रसिद्ध तज्ञ डॉ. सुशील मांनधनिया दर तिसऱ्या गुरुवारी सर्च येथे पुरवतील.
कर्करोग हा एक धोकादायक आजार आहे आणि तो विविध कारणांमुळे विविध प्रकारचा असू शकतो. कॅन्सर फक्त तंबाखू खाणाऱ्या किंवा चघळणाऱ्यां मध्येच होतो असे नाही तर हा आजार आता स्तनाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग आणि इतर अनेक प्रकारांमध्ये दिसून येतो.स्तनाचा रंग बदलणे, स्तन लटकणे, गाठ येणे किंवा आकार बदलणे ही सर्व स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. त्याचप्रमाणे श्वास लागणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, स्नायू आणि हाडे दुखणे ही सर्व फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. म्हणूनच कोणत्याही संकोच न करता तुमच्या समस्येची सखोल तपासणी करण्यासाठी डॉक्टरांकडे जाणे खूप महत्वाचे आहे. सर्च येथील दवाखान्यात दर महिन्याचा तिसरा गुरुवारी कर्करोग ओपीडी तपासणी व उपचारा साठी उपलब्ध असणार. तरी सर्वांनी या ओपिडी चा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन सर्च ने केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here