१५० विद्यार्थ्यांना खेळातून व्यसनमुक्तीचे धडे

156

– ताडगाव शाळेमध्ये उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, १० ऑगस्ट : व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवत व्यसनमुक्त विद्यार्थी घडविण्याच्या उद्देशाने मुक्तिपथ अभियानाने विशेष कार्यक्रम सुरु केले आहे. या अंतर्गत अतिदुर्गम अशा भामरागड तालुक्यातील ताडगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील एकूण १५० विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देत जागृती करण्यात आली. विशेष म्हणजे, २०२१-२२ या शैक्षणिक सत्रामध्ये भामरागड तालुक्यातील एकूण ४० शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला होता.
दरम्यान, उपक्रमात तंबाखू व दारू व्यसनाबाबत गावातील ८ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. जे विद्यार्थी तंबाखू, खर्रा खात नाही त्यांनी पुढे खाऊ नये. वर्गातील किंवा गावातील सहकारी मित्र खात आहे, त्यांना खाण्यापासून वाचवावे, वडील-आई खर्रा खात असल्यास त्यांना खाऊ नका, अशी विनंती करावी. दुकानात खर्रा किंवा तंबाखू पदार्थ आण्यास जाऊ नये. कुणी आग्रह केल्यास नाही म्हणावे. विद्यार्थ्यांनी गावाचे व शाळेचे व्यसनमुक्तीचे सैनिक बनावे व भविष्यात व्यसनाच्या मार्गाला लागू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच गीत, तार टपाल टेलिफोन ,डॉज बाल अशा विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. व्यसनाचे दुष्परिणाम व गांभीर्य सांगण्यात आले. तसेच ‘आमची शाळा तंबाखूमुक्त करु’ असाही संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी घेतला.
या उपक्रमात मुक्तीपथ तालुका कार्यकर्ते आबिद शेख, विद्या पुंगाटी यांनी विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम पटवून सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी. येस. खोब्रागडे, शिक्षक शेख, भसारकर, नैताम, तोटे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here