१४५६८ या टोल फ्री क्रमांकावरून होणार समस्य व तक्रारींचे निवारण

124

The गडविश्व
गडचिरोली, १९ सप्टेंबर : राष्ट्रीय समाजिक संरक्षण संस्था (NISD), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाऊडेंशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी (वयोमर्यादा ६० वर्ष) राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फांऊडेशन, पुणे तर्फे चालविली जात आहे. सदर राष्ट्रीय हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक १४५६७ असा आहे.
या राष्ट्रीय हेल्पलाईनचा उद्देश वयोवृध्‌द नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी, शासन निर्णय क्रमांक जेष्ठता-2016/प्र.क्र.71/सामासु,दिनांक 09 जूलै, 2018 मध्ये नमुद बाबीकरीता जेष्ठ नागरीकांच्या जिवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचाराग्रस्त वृध्द व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आपल्या समस्या/तक्रारींच्या निवारणासाठी वृद्धांनी राष्ट्रीय हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १४५६७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे गडचिरोली निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here