हिवताप आजारबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी

397

The गडविश्व
गडचिरोली : हिवताप निर्मुलनासाठी उपाचारा बरोबर प्रतिबंध महत्वाचा आहे. या आजारा चा फैलाव हा ऍन्नाफिलिस डासाच्या मादी पासुन होतो त्यामुळे जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही केले गेले त्याची आठवण म्हणुन जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल ला साजरा करण्याचे मुख्य कारण आहे. हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य तितकेच महत्वाचे आहे.सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवताप दिन म्हणुन घोषीत केला आहे.या पार्श्वभुमीवर जिल्हात सर्व आरोग्य संस्थेत 25 एप्रिल 2022 रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येतो 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत
हिवताप जन-जागृती मोहीम राबवीण्यात येत आहे. भविष्यात या आजाराचा उद्रेक होवु नये म्हणुन वेळीच प्रतिबंधातमक उपयोजना राबिवीण्याच्या दुष्टिने नागरिकांनी जागरुक राहावे व या आजाराची लक्षणे आढळुन आल्यास वेळीच नजिक च्या आरोग्य उपकेंद्र,प्रा.आ.केंद्र,ब ग्रामिण रुग्णालयात उपचार घ्याची गरज असते.
हिवताप आजारात रुग्णांस थंडी वाजुन ताप येतो व हुळहुळी भरते हा ताप 1 दिवसा आळ किंवा 2 दिवसा आळ येतो अंगदुखणे,डोके दुखणे तसेच रुग्णांस पाघरुण घ्यावेसे वाटते व नंतर घाम येऊन ताप कमी होतो आणि रुग्णास थकवा येतो या साठी हिवतापाचे लवकर निदान व त्वरित उपचार करुन घ्यावेत उपचार न घेतल्यास तसेच अर्धवट उपचार घेतल्यास हा आजार प्राण घातक ठरु शकतो वांरवार ताप येऊण रुग्ण बेशुद होऊ शकतो डेंगु च्या लक्षणात रुग्णास 2 ते 7 दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतों डोकेदुखी,साधेदुखी,स्नायु दुखी होऊण उलटया होणे,डोळयाच्या आतील भागात दुखणे अंगावर पुरळ येणे,नाक तोंड यातुन रक्त स्वाब होणे, अशक्तपणा,भुख मंदावणे,तोंड कोरड पडणे, ही लक्षणे दिसुन येतात त्यामुळे त्वरीत उपचार घेणे आवश्यक आहे.
मागील तीन वर्षातील गडचिरोली जिल्हयाची हिवताप आजाराची परिस्थिती पाहिली तर सन 2020 मध्ये 661169 रक्त नमुने घेतले त्यात 6485 रुग्णांचे रक्त दुषित आढळुन आले. व मृत्यु 6 तसेच 2021 मध्ये 875134 रक्त नमुने घेतले त्यात 12326 रुग्णाचे रक्त दुषित आढळुन आले असुन मुत्यु 8 तर 2022 मार्च अखेर 274789 रक्त नमुने घेतले त्यात 1789 रुग्ण आढळुन आले असुन 3 हिवतापाने मृत्यु झाले आहे तसेच 2020 मध्ये 132 रक्त जल नमुणे तपासले असुन त्यात 16 डेंग्यु दुषित आढळुन आले तसेच 2021 मध्ये 159 रक्त जल नमुणे तपासले असुन 70 नमुणे डेंग्यु दुषित आढळुन आले व 2 मुत्यु झाले. तर 2022 मार्च अखेर 12 रक्त जल नमुणे तपासले असुन 1 नमुणा डेंग्यु दुषित आढळुन आला आहे.
भविष्यात हिवताप आजाराचे उद्रेक होवु नये म्हणुन आरोग्य खात्यामार्फत सर्व प्रकारचे नियोजन करण्यात आलेले असुन हिवताप आजारावर मात ळवण्यासाठी गावातील सर्व नागरीकाचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी खालील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपाययोजना जनतेने राबविणे गरजेचे आहे.वरिल दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणा-या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वानी हातभार लावला पाहीजे. असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी केले आहे.
( आपल्या घराभोवती पाणी साचु देवु नका.घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातुन एक वार निश्चित करुन रिकामे करावेत या साठयातील आतील बाजु व तळ घासून पुसुन कोरडया करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट झाकनाने झाकुन ठेवावेत,आंगन व परिसरातील खडे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी, झोपतांना पुर्ण अंगभर कपडे घालावे,पांघरुन घेवुन झोपावे,संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात,खिडक्यांना जाळया बसवाव्यात,झोपतांना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा, लहान बालकांना अंगभर कपडे घालण्यात यावेत. घराच्या छतावरील फुटके डब्बे,टाकऊ टायर्स,कप,मडकी,फ्रिज,च्या मागे साठलेले पाणी,ए.सी.चे पाणी,कुलरमध्ये असलेल्या पाण्याची पाच दिवसाला विल्हेवाट लावावी,संडासच्या हॅट पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा,दर आठवडयाला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.हिवतापाची तपासणी व उपचार सर्व आरोग्य उपकेंद्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here