हिरापूर येथील महिला आक्रमक, पकडली अवैध दारू

246

– दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवार कठोर कार्यवाहीची मागणी
The गडविश्व
ता. प्र / सावली ,२९ सप्टेंबर : तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या हिरापूर येथील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत अवैध दारू विकणाऱ्या इसमांची दारू पकडली. दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवार कठोर कार्यवाही करण्याची मागणी पोलिसांना केली.
हिरापूर येथील काही इसम अवैध मोहफूल व देशी दारू विकत असल्याची माहिती महिलांनी लागली होती. घटना स्थळावर जाऊन महिलांनी वेगवेगळ्या तीन ठिकाणाहून दारू जप्त केली व झालेल्या घटनेची माहिती सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांना दिली. सावली पोलीस स्टेशनंचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी आपली चमू घटनास्थळी पाठविली व महिलांनी पकडलेल्या दारूचा पंचनामा केला व आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हिरापूर येथे सन १९९५ पासून दारूबंदी असून या काळात कुणीही दारू विकत नव्हते. मात्र किसान नगर येथील काही व्यक्ती हे हिरापूर परिसरात दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात येणाची दाट शक्यता आहे. सावलीचे ठाणेदार कर्तव्य दक्ष असल्याची प्रतिक्रिया हिरापूर येथील सरपंचा प्रिती गोहणे यांनी महिलांना दिली आणि पोलीस स्टेशनला भ्रमण ध्वनीवरून संदेश देताच त्यांची चमू घटना स्थळी दाखल झाली. यापूर्वीही त्यांनी महिलांना मदत केली होती.त्यामुळे त्याच्या सहकार्यशील वृत्तीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
अवैध दारू पकडण्याकरिता सरपंचा प्रिती गोहणे यांच्या नेतृत्वात हिरापूर येथिल उपसरपंच शरद कन्नाके, ग्रामपंचायत सदस्य सौ.नीता मुनघाटे, माधुरी कन्नाके, सविता भोयर, सौ. देशमुख यांनी मोहीम राबविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here