The गडविश्व
गडचिरोली : समाजसेवा हीच ईश्वरसेवा तसेच २० टक्के राजकारण ८० टक्के समाजकारणाची शिकवण दिलेले तसेच अडचणीच्या वेळी धावून जाण्याची शिकवण शिवसेना प्रमुखांनी दिली होती तोच वसा घेऊन आज शिवसेना काम करीत आहे. आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त गडचिरोली शहर शिवसेनेतर्फे येथील महिला बाल रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख रामकीरीत यादव तसेच माजी नगराध्यक्षा डॉ.अश्विनी रा.यादव यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळेस जि.प्र. वासुदेव शेडमाके, राजुभाऊ कावळे, नंदूजी कुमरे, पप्पी पठाण, अमित यासलवार, आकाश सुमंतावार, निलेश, सुरज बामणवाडे, अनिकेत, विशाल, गौरव चांदेकर, वैभव भांडेकर, प्रिया रामावत, निकिता रामावत तसेच इतरही शिवसैनिक उपस्थित होते.