– धानोरा पोलिसांची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली : धानोरा टोला येथील विक्रेत्यांनी होळी सणानिमित्त दारू गाळण्यासाठी नदी परिसरात लावलेला ८० हजार रुपये किंमतीचा मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केल्याची कारवाई सोमवारी धानोरा पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली.
धानोरा टोला येथे जवळपास ३० ते ३५ दारूविक्रेते सक्रिय असून मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जाते. होळी निमित्त मोठ्या प्रमाणात दारू उपलब्ध असू शकते, या माहिती आधारे, धानोरा पोलिसांनी नदी परिसरात शोधमोहीम राबवून ठिकठिकाणी उपलब्ध झालेला ८० हजार रुपये किमतीचा मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट करण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक देडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सानप यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने केली. यावेळी तालुका चमू उपस्थित होते.