स्व. प्राचार्य रमेशचंद्रजी मुनघाटे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

229

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ११ ऑक्टोबर : स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचलित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्मृतीशेष प्राचार्य स्वर्गीय रमेशचंद्र मुनघाटे यांचा अकरावा पुण्यस्मरण सोहळा प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.गणेश चुदरी डॉ. विना जंबेवार डॉ. एच डी लांजेवार डॉ. पंढरी वाघ व डॉ. आर पी किरमिरे डॉ. डी बी झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी भव्य रक्तदान व रक्तगट शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारा आयोजित रक्तदान शिबिरात राष्ट्रीय स्वयंसेवकांनी आणि स्थानिक धानोरा येथील ग्रामस्थांनी रक्तदान करून स्वर्गीय रमेशचंद्र मुनघाटे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
दरम्यान उपस्थित मान्यवरांनी मुनघाटे सरांच्या शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक व राजकीय कार्यावर प्रकाश टाकला चंद्रपूर गडचिरोलीच्या पंचक्रोशीत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून शिक्षणाचा प्रचार प्रसार केला आणि आदिवासी परिसरातील वंचित दुर्बल घटकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली
संचालन व प्रास्ताविक डॉ. गणेश चौधरी यांनी तर आभार डॉ.पंढरी वाघ यांनी केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ प्रियंका पठाडे रा.से यो. सह. कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रशांत वाळके, प्राध्यापक मानतेश तोंडरे, डॉ सचिन धवनकर, प्राध्यापक नितेश पुण्यप्रेटीवर, डॉ प्रवीण गोवणे, डॉ संजय मुरकुटे, प्राध्यापक गिता भैसारे यांच्यासह सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी आणि बहुसंख्य रा से यो स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here