The गडविश्व
नागपूर, २ ऑक्टोबर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज टेक्निकल अँड एज्युकेशन सोसायटी नागपुर व्दारा संचालित स्वामि विवेकानंद वृद्धाश्रम सावणेर येथे आंतरराष्ट्रीय वृध्ददिवस साजरा करण्यात आला.
स्वतःच सुंदर अस कुटुंब बसवल, मुलांना मुलींना जन्म दिलं , लहाणपणाच मोठ्यात रूपांतर केलं, खूप छान शिक्षण दिलं, मुलांच्या शिक्षणासाठी खुप अस कठोर मेहनत घेतली हे सर्व केल्यानंतर मुलाला पंख फुटले, मुलाचे लग्न झाले त्यानंतर ज्या मानवान जन्म देवुन मोठं करुन आता त्यांना वृध्दपण आल्याने घरातुन बाहेर काढून टाकलं व त्यांना सदाबहार केलं अश्या वृद्धांना समोरचे वृध्दपण कस होणार अशी समस्या निर्माण झाली. वृध्द कोणीतरी आम्हाला आनंदात ठेवेल याची वाट बघत असेल तर अश्या वृध्दानां स्व.डॉ योगेश कृष्णराव कुंभलकर तसेच युगात योगेश कुभलकर तसेच वनिता योगेश कुभलकर या कुटुंबाने व कुभलकर दाम्पत्याने वृध्दांना आनंदित सुखमय जिवन जगता यावे यासाठी एक हात मदतीचा अशी संकल्पना ठेवुन सावनेर येथे वृद्धाश्रम उघडले आणि वृध्दांना सेवा देत आहे. १ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय वृध्ददिवस साजरा करण्यात येतो त्याचे औचित्य साधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज टेक्निकल अँड एज्युकेशन सोसायटी नागपुर व्दारा संचालित स्वामि विवेकानंद वृद्धाश्रम सावणेर येथे शनिवार १ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय वृध्ददिवस थाटामाटात उत्साहात साजरा करण्यात आला.
