स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने जिल्हा परिषद विभाग गडचिरोली तर्फे विविध उपक्रम

157

– खा.अशोकजी नेते यांची कर्यक्रमाला उपस्थतीती
The गडविश्व
गडचिरोली, १८ ऑगस्ट : जिल्हा परिषद विभागा तर्फे स्वतंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून देशभक्तीपर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, विविध प्रकारचे उपक्रम, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रम रिक्रीरेशन हॉल जिल्हा क्रीडा कार्यालय कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना खा.अशोक नेते यांनी स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव हा संपूर्ण देशात अमृत महोत्सव साजरा केल्या जात आहे. शासन स्तरावर विविध ठिकाणी उपक्रमसुद्धा घेतल्या जात आहे. हि अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन याप्रसंगी केले.
याप्रसंगी खा.अशोक नेते, जिल्हाध्यक्ष ओबिसी मोर्चा तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अंबपकर मुख्य लेखाधिकारी, खरेंद्र कुत्तीरकर उपमुख्यकार्यकारी अधिकारी, धामणे शिक्षणाधिकारी तसेच अनेक अधिकारी, स्पर्धेतील विजेते व विद्यार्थीनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here