स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता समारोह : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात निबंध व रांगोळी स्पर्धा संपन्न

156

The गडविश्व
गडचिरोली, १८ ऑगस्ट : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभप्रसंगी काल १७ ऑगस्ट रोजी सकाळी. १११.०० वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सामूहीक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थीत होते. तसेच आज जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात स्वराज्य महोत्सव सागंता समारोह प्रसंगी निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. निबंध स्पर्धेचा विषय स्वातंत्र्याचा उपभोग घेतांना पाळावयाची कर्त्यव्य आणि जवाबदारी, स्वातंत्र्य म्हणजे काय आणि त्याचे प्रकार हे होते.
निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धेत सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांना प्र. जिल्हा ग्रंथालय अधिकारी र. वा. शेंडे व रवीद्र समर्थ, ग्रंथपाल, शिवाजी सार्वजनिक वाचनालय, गडचिरोली यांचे हस्ते स्पर्धा परीक्षेची पुस्तक बक्षिस रूपात भेट देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here