स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : सिरोंचा तालुका प्रशासनाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

208

The गडविश्व
गडचिरोली, १८ ऑगस्ट : अमृत महोत्सव प्रसंगी सिरोंचा तालुका प्रशासनाचे वतीने तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने १०ऑगस्ट २०२२ रोजी तालुक्यातील शासकिय अधिकारी कर्मचारी शिक्षक, शालेय विद्यार्थी यांचे वतीने रॅली काढुन हर घर तिरंगा उभारणे या उपक्रमांतर्गत लोंकामध्ये जनजागृती करण्यात आले. १२ ऑगस्ट रोजी तालुक्यातील तहसिल कार्यालय सह इतर सर्व शासकिय कार्यालयामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. १४ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय, सिरोंचा येथे सकाळी १०.०० ते ११.०० वाजता पर्यंत निबंध स्पर्धेचे तसेच दुपारी ३.०० ते ५.०० वाजेपर्यंत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये प्रथम, व्दितीय, तृतिय क्रमाकांचे विद्यार्थ्यांचे १५ ऑगस्ट २०२२ रोजी रोख स्वरुपात पारितोषीक व प्रशस्तीपत्र देऊन विद्यार्थ्याचे गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे निबंध व रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या इतर सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे दृष्टीने सहभागाबद्दल सर्वांना प्रशस्तीपत्र देवून अभिनंदन करण्यांत आले. १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९.०५ वाजता सिरोंचा तालुक्यातील मुख्य शासकिय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सिरोंचा येथील जयस्तंभ मैदानात भव्य- दिव्य स्वरुपात पार पाडण्यात आला. त्याप्रसंगी तालुक्यातील विविध शाळकरी विद्यार्थ्यांचे स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव प्रसंगी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये रोख स्वरुपात पारितोषीक व प्रशस्तीपत्र देवून विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यांत आले. त्याशिवाय सहभाग घेतलेल्या प्रत्येक समुहाला त्यांचे सहभागाबद्दल प्रोत्साहन म्हणुन १०००/- (एक हजार रुपये फक्त) देण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ठ ठरलेल्या दोन समुहाला रोख पारितोषिकासह (शिल्ड/ ट्रॉफी) विजयचिन्ह तसेच प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यांत आले. १६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी वृक्षारोपन उपक्रमांतर्गत तहसिल कार्यालय सिरोंचा परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वतीने वृक्षारोपण करण्यांत आले. त्याचप्रमाणे सर्व कार्यालयीन अधिकारी/ कर्मचारी यांनी पदयात्राव्दारे ऐतिहासीक वारसास भेटी देवून माहिती घेण्यात आली. १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता सिरोंचा येथील जयस्तंभ मैदानात तालुक्यातील सर्व कार्यालयीन अधिकारी/ कर्मचारी, शालेय शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिक यांचे संपुर्ण समुहाने सामुहिक राष्ट्रगाण कार्यक्रम घेण्यात आला. उपरोक्त प्रमाणे तालुक्यात उपक्रम राबविण्यांत आले. तसेच १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता सामुहिक राष्ट्रगाण संपल्यानंतर तहसिलदार सिरोंचा जितेंद्र शिकतोडे, यांचे वतीने सदर उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहभागी झालेल्या प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरिता हातभार लावलेल्या तालुक्यातील सर्व अधिकारी/ कर्मचारी, शिक्षक, शालेय विद्यार्थी व समस्त नागरिकांचे आभार व्यक्त करुन भारतीय स्वांतत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवाची सांगता करण्यांत आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here