– महाशिवरात्री निमित्त रक्तदान शिबीराचे वैरागड येथे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली : महाशिवरात्री निमित्त स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समिती व शिवशाही गृप वैरागडच्या वतीने वैरागड येथील भंडारेश्वर मंदिरात रक्तदान शिबीराचे आयोजन 2 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या शिबीरात 13 रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.
यामध्ये कवीश्वर खोब्रागडे, सचिन अहिरे, अश्विन लांजीकर, आदेश आकरे, समीप उईके, लोमप बरडे,, अंकित बोधनकर, राकेश रणदिवे, आशिष चौधरी, आकाश रणदिवे, बादल गिरीपुंजे, सिकंदर नंदरधने, आशिष हर्षे यांचा समावेश आहे.
रक्तपेढीतला रक्तसाठा कमी असल्याने स्वयं रक्तदात गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने ठिकठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. समतीच्या माध्यमातून अनेक रक्तदात पुढाकार घेत रक्तदान करतात. तसेच समितीच्या वतीने वेळीच रक्तपुरवठा सुध्दा करण्यात येत असतो. रक्तदान शिबीरात अनेक युवतीही पुढाकार घेत असतांना दिसत आहे. अनेकांच्या मनातील रक्तदान विषयीचा न्यूनगंड दूर करत योग्य मार्गदर्शन सुध्दा समितीच्या माध्यमातून दिला जात आहे. त्यामुळे अनेक रक्तदाते पुढे येत रक्तदान करीत आहे.