The गडविश्व
गडचिरोली, २१ सप्टेंबर : स्थानिक पंचायत समिती मध्ये स्वच्छता ही सेवा १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत गावांच्या दृष्यमान स्वच्छतेची राष्ट्रव्यापी मोहिम राबविण्यात येत आहे. हि सेवा राबविण्याच्या अनुषंगाने गावांमध्ये दृष्यमान स्वच्छता गावातील कचराकुंडया व सुरक्षित ठिकाणची साफसफाई करणे, कचरा संकलन आणि विलगीकरण करणेकरीता केंद्र निर्माण करणे, पाणवठया जवळील परिसर स्वच्छ ठेवुन त्याच्या सभोवताली वृक्षारोपण करणे इ अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून आज २१ सप्टेंबर २०२२ ला ग्रामपंचायत दिभना, वसा, पोर्ला, नगरी येथे स्वच्छता ही सेवा अभियान यशस्वीतेसाठी जनजागृती करीता पुर्वी बहुउद्येशिय संस्था व्दारा गावात कलापथक सादरीकरण करण्यात आले. या कलापथकाव्दारे स्वच्छता ही सेवा, सेवा पंधरवाडा, बुस्टर डोस लसिकरण, लम्पी आजार लोकजागृती व विविध योजना जोकजागृती इ. उपक्रम राबविण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे शुभारंभ ग्रामपंचायत दिभना येथे गट विकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सरपंच व सचिव तसेच कार्यालयीन कर्मचारी प्रामुख्याने हजर होते.