सीआरपीएफ 113 बटालियन धानोराच्या वतीने 32 वा स्थापना दिवस साजरा

554

The गडविश्व
धानोरा : 113 बटालियन CRPF ने आपला 32 वा स्थापना दिवस धानोरा येथील मुख्यालयात 31मार्च 2022 ते 2 एप्रिल 2022 पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला.
113 बटालियन CRPF ने सर्वप्रथम 31मार्च 2022 रोजी धानोरा येथे CRPF मेळावा आयोजित केला होता. ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरीकांनी जत्रेचा आनंद लुटला, जत्रेत सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ व खेळ ठेवण्यात आले होते. तसेच 1 एप्रिल 2022 रोजी कमांडंट जी.  डी. पंढरीनाथ यांनी प्रशंसापत्रे दिली.
त्याच अनुषंगाने 2 एप्रिल 2022 रोजी CRPF च्या जवानांनी 113 बटालियन CRPF च्या मुख्यालयात अतिशय नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे DIG ऑपरेशन CRPF, गडचिरोलीचे मानस रंजन यांचे स्वागत 113 बटालियनचे कमांडंट जी.  पंढरीनाथ यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ११३ बटालियनचे द्वितीय कमान अधिकारी राजपाल सिंह यांनी ११३ बटालियनच्या ३१ वर्षातील कामगिरीबद्दल सांगितले, त्यानंतर रंगारंग कार्यक्रम सुरू झाला, ज्यामध्ये प्रत्येक राज्याच्या नृत्यासोबत गाणी गायली गेली. दक्षिण भारतीय सामूहिक नृत्य कडगम जवानांनी दाखविले जे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डीआयजी श्रीमानस रंजन यांनी भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना दिनी प्रत्येक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अष्टपैलू खेळाडू, जल्लोषी व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या जवानांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली. ११३ बटालियनचे सहायक उपनिरीक्षक अब्दुल सत्तार यांना दिले अष्टपहेलु परफॉर्मर ची टॉफी देण्यात आली.
यावेळी सीआरपीएफचे डीआयजी मानस रंजन यांच्या यांच्यासह 113 बटालियनचे कमांडंट जी.  डी.पंढरीनाथ, 192 बटालियनचे कमांडंट देवराज, गडचिरोली पोलीस अतिरिक्त एस.  प. सोम्या मुंडे (IPS), धानोरा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन देवेंद्र सावसागडे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस व CRPF अधिकारी व जवान उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here