The गडविश्व
ता.प्रतिनिधी / धानोरा : येथील सीआरपीएफ ११३ बटालियन मुख्यालयात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
११३ बटालियन सीआरपीएफ आपल्या जवानांसाठी कर्तव्याबरोबर सर्व धर्माच्या सामाजिक कर्त्तव्याचे पालन सुद्धा करीत आहे. ११३ बटालियन सीआरपीएफ च्या धानोरा येथील मुख्यालय बटालियनच्या सर्व जवानांनी मिळून आपल्या मुस्लिम मित्राच्या सन्मानार्थ रमजान च्या पवित्र महिन्यात इफ्तार पार्टी चे आयोजन केले होते. यामध्ये रोजा ठेवत असलेल्या जवानाचा विशेष सम्मान करण्यात आला तसेच बटालियन चे कमान्डेंट जी.डी. पंढरीनाथ यांनी खजूर व फळ भेट देऊन सर्व जवानांना इफ्तार पार्टी च्या शुभेच्छा दिल्या.यानंतर बटालियन च्या सर्व जवानांनी मिळून रोजा उपवास सोडला. या अगोदर बटालियन चे द्वितीय कमान अधिकारी राजपाल सिंह यांनी रमजान महिन्याचे महत्व व रोजा ठेवण्याच्ये नियम याची विस्तृत माहिती दिली.याप्रसंगी ११३ बटालियन चे उप कमान्डेंट प्रमोद सिरसाठ, बटालियनचे वैद्यकीय डाॅ.आदित्य पुरोहित व बटालियनचे सर्व अधिकारी व जवान उपस्थित होते.