– भव्य मोर्चाद्वारे तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन
The गडविश्व
सावली : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बेताल व्यक्तव्य केल्याच्या निषेधार्थ माळी समाज अस्थायी समिती सावली तर्फे सावली शहरातील बाजारपेठ बंद करून भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पदावरून पायउतार करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
मोर्चाला समीर कदम, डॉ. अभिलाशा गावतुरे, सोमनाथ वाढई, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष रोशन बोरकर, सावलीचे नगराध्यक्ष लता लाकडे, उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार, नगरसेवक विजय मूत्यालवार, नितेश रस्से, अतबोध बोरकर, प्रफुल वाळके, सचिन संगीडवार, प्रियंका रामटेके, अंजली देवगडे, साधना वाढई, ज्योती शिंदे, ज्योती गेडाम, समितीचे उपाध्यक्ष अतुल लेनगुरे, सचिव भोगेश्वर मोहूर्ले, सहसचिव सुनील ढोले, कोषाध्यक्ष मनोज चौधरी, काँग्रेस चे शहराध्यक्ष भारती चौधरी, वंदना गुरनुले, अनिल गुरनुले व समाजातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पद संविधानीक पद आहे. मान. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी स्पष्ट केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज व रामदासाचा काहीही संबंध नाही. मात्र राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी खोटी व समाजाला भ्रमित करणारी माहिती सांगत आहेत. तर शिक्षणाचा सागर घरोघरी पोहोचविणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर खालच्या स्तरावर भाष्य केले. ज्या महाराष्ट्राची ओळख शिव- फुले- शाहू- आंबेडकर यांच्या मुळे आहे त्याच महाराष्ट्राचे राज्यपाल महापुरुषांचा अपमान करीत आहेत. त्यामुळे अशा विकृत मानसिकतेच्या राज्यपालाला तात्काळ पदावरून पायउतार करावे अशी मागणी निवेदनातून महामहिम राष्ट्रपती यांना करण्यात आली.