-विश्वशांती विद्यालयात शुभारंभ
THE गडविश्व
सावली : जापनीज इन्सेफेलायटीज (मेंदूज्वर) या रोगामुळे दरवर्षी अनेक बालकांचा मृत्यु होतो. कोवळी बालके या आजाराला बळी पडतात. त्यामुळे 1 ते 15 वयोगटातील बालकांकरीता शासनाने मेंदूज्वर प्रतिबंधात्मक लस सुरू केली आहे. या लसीकरण केंद्राचा शुभारंभ विश्वशांती विद्यालय सावली येथे पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांच्या हस्ते पार पडला.
जॅपनीज इन्सेफेलायटिस ही लस सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना द्यावा असे आवाहन सभापती विजय कोरेवार यांनी केले. या लसीपासून कोणताही दुष्परिणाम नसल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ थेरे यांनी माहिती दिली.
यावेळी विश्वशांती विद्यालयाचे मुख्यध्यापक मुप्पावार, वैद्यकीय अधिकारी डॉ गोबाडे उपस्थित होते. जॅपनिज एन्सेफलायटीज (जे.ई) लसिकरणामूळे मेंदूज्वर या आजारापासून बालकांचे संरक्षण होणार आहे.
या लसिकरणामुळे जे.ई (मेंदूज्वर) या आजारापासून बचाव करण्यास मदत होणार आहे. यापूर्वी हि लस पाल्यांना लावली असेल तरी सुध्दा या अभियान कालावधीमध्ये हि लस देणे आवश्यक आहे.