सावली नगर पंचायत च्या उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीकडून संदीप बाबुराव पुण्यापकार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

229

The गडविश्व
सावली : चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा बालेकिल्ला असलेल्या सावली नगर पंचायती वर एकहाती सत्ता काबीज करत पुन्हा एकदा सावली वासीयांनी विकासाला मत देत १७ पैकी १४ उमेदवारांना निवडून दिले. आता उपनगराध्यक्ष पदासाठी संदीप बाबुराव पुण्यापकार यांची बिनविरोध निवड होऊन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सावली च्या विकासाला कधीच काही कमी पडू दिले नाही. यावर सावलीच्या जनतेनी विश्वास ठेवत काँग्रेस ला बहुमत प्राप्त करून दिले.
यावेळी उपस्थित काँग्रेसचे जेष्ठ नेते संदीप पाटील गड्डमवार, पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, जेष्ठ नेते प्रशांत राइंचवार, नगरसेवक विजय मुत्यालवार , नगरसेवक सचिन संगीडवार, नगरसेवक नितेश रस्से, नगरसेवक प्रीतम गेडाम, नगरसेवक प्रफुल वाळके, नगरसेवक अंतबोध बोरकर, नगरसेवक प्रीतम गेडाम, माजी उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहूर्ले, माजी नगरसेवक गुणवंत सुरमवार, नगर पंचायत मुख्याधिकारी सौ. मनीषा वजाळे, उपविभागीय अधिकारी खेडकर, राकेश पाटील गड्डमवार, मोहन गाडेवार, नितीन गड्डमवार, स्नेहदीप वाळके, स्वप्नील संतोषवार, व संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here