सावली : घरात घुसलेल्या बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद

747

– तालुक्यातील उसेगाव येथील घटना

The गडविश्व
सावली : तालुक्यातील उसेगाव येथील भगवान आवारी यांच्या घरात आज पहाटेच्या सुमारास बिबटया घुसला होता. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. वनविभागाचे कर्मचारी व बचाव पथक घटनास्थळी बिबट्याला जेरबंद करण्याकरिता दाखल झाले होते. अखेर काही मिनिटातच या बिबटयाला वनविभागाने जेरबंद केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील उसेगाव येथील अवारी कुटुंब घरात झोपल असतांना पहाटेच्या सुमारास भगवान यांच्या आइ सिंधुबाई लघशंकेकरीता उठल्या असता खोटच्या खाली काहीतरी असल्याचे वाटले. दरम्यान खाटेखाली सिंधुबाई यांनी खाटेखाली बघण्याचा प्रयत्न केला असता बिटटयाने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र त्यांनी बिबटयाच्या हल्ल्याला प्रतिकार करत घराबाहेरत निघून आले. तेव्हा लागलीच घटनेची माहिती गावातील सरपंच यांना दिली असता त्यांनी वनविभागाला सदर माहिती दिली. वनरक्षक चौधरी यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली व वनविभाच्या पथकासह बचाव पथक दाखल होत काही मिनटातच बिबटयाला जेरबंद केले.
सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. सिंधूबाई यांनी धाडस करीत प्रतिकार केला व आपला जिव वाचविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here