सावली : अवैध गोवंश तस्कराच्या आवळल्या मुसक्या, १९ गोवंशांची सुटका

520

– ट्रकसह ११ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
सावली : १९ गोवंश जनावरांना ट्रकमध्ये कोंबून अवैध वाहतूक करतांना गोवंश तस्कराच्या सावली पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सदर कारवाई आज १२ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत ट्रकसह ११ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी इब्राहिम खान हमीद खान (३०) रा. अन्सारी रोड, राजेंद्रनगर,रंगारेड्डी, आंध्रप्रदेश व ट्रकचा मालक विरुद्ध सावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज १२ एप्रिल च्या पहाटेदरम्यान सावली पोलीस स्टेशन हद्दीतून अवैध गोवंश जनावरे वाहतूक होणार आहे अशी गुप्त माहिती मिळाली असता व्याहाड नजीकच्या चिचबोडी फाटा येथे नाकाबंदी करून पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली मार्गे येत असलेले अशोक लेलँड कंपनीच्या टीएस ०७ यूएफ ३१८२ क्रमांकाच्या ट्रकला थांबवून ट्रकची पाहणी केली. ट्रकमध्ये लहान मोठे १९ गोवंश जनावरे निर्दयपणे, क्रूरपणे तोंडाला मोरके व दोराने पाय बांधून कोंबून ठेवलेले दिसले. सदर १९ जनावरांची सुटका करून गोशाळेत पाठवण्यात आले. गोवंशांची किंमत १ लाख ९० हजार रुपये व ट्रक किंमत १० लाख रुपये असा एकूण ११ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध सावली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे, ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौजदार लक्ष्‍मण मडावी, पितांबर खरकाटे पोलीस कॉन्स्टेबल दीपक चव्हाण, धीरज पिटूरकर, चालक कुळमेथे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here