सावरगाव येथे मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती गठीत

113

The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील सावरगाव येथे मुक्तिपथतर्फे कार्यशाळेचे आयोजन करून ग्रामपंचायत समिती गठीत करण्यात आली. तसेच अवैध दारू व तंबाखूविक्रीवर अंकुश लावण्यासाठी चर्चा करण्यात आली.
यावेळी मुक्तिपथ अभियान गावस्तरीय रचनेची माहिती देण्यात आली. मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती पुनर्गठित करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सरपंच रुंदा मडावी व सचिवपदी ग्रामसेवक वाय. व्ही. भेंडारे यांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायत समितीद्वारे मुक्तिपथ गाव संघटनेला मान्यता देण्यात आली. गावातील अवैध दारू व तंबाखू विक्रेत्यांवर दंड ठोठावण्याचा अधिकार गाव संघटनेला राहील. ग्रापं अधिनियम नुसार गावात दारू व तंबाखू विक्री केल्यास ५००० रुपया पर्यंत दंडात्मक कार्यवाही केल्या जाईल. ग्रामपंचायत समितीची दर महिन्याला आढावा बैठक घेऊन नियोजन करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
यावेळी सरपंच रुंदा मडावी, उपसरपंच दयाराम वरखडे, तालुका संघटक अमोल वाकुडकर, आशा स्वयंसेविका अक्षता तुमराम, पोलिस पाटील मुकुंदा तुमराम, सहकारी संस्थेचे अध्यक्ष गजानन मडावी, प्रमोद मडावी, तंमुस सदस्य रोशन राऊत, माधुरी हजारे, अशिका पेंदाम, सुमित्रा नेवारे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here