सावरगाव येथे दादालोरा खिडकी उपक्रमातून जनजागरण मिळावा

256

The गडविश्व
ता. प्र / धानोरा , २३ नोव्हेंबर : तालुक्यातील सावरगाव येथील पोलीस मदत केन्द्र सावरगाव येथे १९ नोव्हेंबर २०२२ रोजी दादालोरा खिडकीतून भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
भव्य जनजागरण मेळावा जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल गडचिरोली, धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.
या काय॔क्रमाचे उदघाटक कुलभट्टीच्या सरपंचा ज्योतिताई उसेंडी, काय॔क्रमाचे अध्यक्ष साहाय्यक कमांडेंट अजयकुमार लकडा सि.आर.पी.एफ ११३ बटालियन, व कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून रामसाय गावडे, कौशल्या शाहू, मोनिका पूडो, तुळशीराम पोरेटी, बलवंतसिंग पडोटे, धनसिगं तूलावी, बिरबल राऊत, धनाऊ कुमरे, मनूराम नूरूटी, पतिराम धुर्वे, भावना मडावी, काजल शेंडे, भालेकर, राजापूरे, रिगंनाते, व शिक्षक वृदं शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा सावरगावं यांनी प्रामुख्याने आपली उपस्थित दर्शवली. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस प्रभारी अधिकारी रमेश पाटील पोलीस मदत केन्द्र सावरगाव यांनी केले.
या काय॔क्रमात सावरगाव, सावरगाव टोला, मोरचूल, कनगडी, बोदनखेडा, गजामेढी, कूलभटी, मरकागावं, कोसमी नं. १ च्या नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शविली.
या भव्य जनजागरण मेळावा मध्ये आदिवासी रैला नृत्य, राणी दुर्गावती हस्तकला, व बिरसामूडां व्हॉलीबॉल स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. दादालोरा खिडकीतून गोरगरीब जनते पर्यंत शासनाकडून विविध योजनांवर लाभ कसे मिळेल व नागरिकांनी ते लाभ कसे प्राप्त करून घ्यावेत याची परिपूर्ण माहिती दिली व सांस्कृतिक, शैक्षणिक, कौशल्य, व क्रीडा क्षेत्रातील अनेक महत्त्व पटवून देण्यात आले.
या मेळाव्यात आदिवासी रैला नृत्य १०, व राणी दर्गावती हस्तकला १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला, व व्हॉलीबॉल स्पर्धा मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, क्रमांकावर आलेल्या सर्व विजेत्यांना प्रोत्साहन बक्षीस वितरण करण्यात आले.
या भव्य जनजागरण मेळावा शांततेने पार पाडण्या करीता व सतत तीन दिवस परिपूर्ण सहयोग देणारे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील पोलीस प्रभारी अधिकारी सावरगाव, पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते सावरगावं, मनोज जासूद, पोलीस हवालदार भास्कर किरंगे, सुधाकर उसेंडी, नायक मूलेटी, पठान, पिठाले, पोलीस अंमलदार केशर राऊत, अमोल रासेकर, बनकर, व या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन विश्वंभर कराले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here