The गडविश्व
गडचिरोली,१२ सप्टेंबर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काल ११ सप्टेंबर ला सारस्वत बहुउद्देशीय संस्था गडचिरोलीच्या वतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
सारस्वत बहुउद्देशीय संस्था गडचिरोली ही विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. काल ११ सप्टेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या भेटी घेऊन त्यांना फळ वाटप केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण मेश्राम, सचिव पंकज मडावी, सदस्य संजय मानकर, करण ढोरे, महेश निलेकार, सचिन ठाकुर, शुभम भांडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.